… म्हणून इंस्टाग्रामने सस्पेंड केले हिंदुस्तानी भाऊचे अकाउंट

बिग बॉस 13 चा स्पर्धक आणि युट्यूबर हिंदुस्तानी भाऊचे (विकास पाठक) इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे. द्वेषयुक्त आणि हिंसा पसरवण्यासारखी विधाने केल्यामुळे अनेक युजर्सनी त्याचे अकाउंट रिपोर्ट केले होते. अनेक युजर्सने रिपोर्ट केल्यानंतर अखेर इंस्टाग्रामने कम्यूनिटी गाईडलाईन्सचे उल्लंघन केले म्हणून हिंदुस्तानी भाऊचे अकाउंट सस्पेंड केले आहे.

कॉमेडियन कुणाल कामराने देखील महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना हिंदुस्तानी भाऊच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. कुणाल कामराने हिंदुस्तानी भाऊ द्वेष पसरवरत असल्याचे म्हटले होते. अनेकांनी त्याच्या अटकेची देखील मागणी केली होती.

अनेक ट्विटर युजरने हिंदुस्तानी भाऊचे अकाउंट सस्पेंड केल्यानंतर आलेल्या नॉटिफिकेशनचे स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. अनेक युजर अकाउंट सस्पेंड केल्याने इंस्टाग्रामला धन्यावाद देखील देत आहेत.

हिंदुस्तानी भाऊच्या व्हिडीओमध्ये अनेकदा शिव्या, भडकाऊ भाषेचा वापर केला जातो. यामुळे तो याआधी देखील चर्चेत आला आहे. याशिवाय तो बिग बॉसच्या 13व्या सीझनमध्ये देखील स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता.