गुगल मॅप्समध्ये आले नवीन अपडेट, जंगल-रस्त्यांची मिळणार अचूक माहिती

दिग्गज टेक कंपनी गुगलने आपल्या गुगल मॅप्स साठी एक नवीन अपडेट जारी केले असून, या नवीन अपडेटमुळे आधीच्या तुलनेत व्हिज्युअल अधिक चांगले देण्यात आलेले आहेत. नवीन अपडेटमध्ये आधीच्या तुलनेत चांगले रंग मिळतील. रंगांच्या आधारावर युजर्सला रस्ते आणि जंगलांबाबत अचूक माहिती मिळेल.

गुगल मॅप्सच्या नवीन अपडेटमध्ये आता जंगल असलेल्या भागाला आधीच्या तुलनेत अधिक हिरवे दाखवण्यात आले आहे. गुगलने या अपडेटला कलर मॅपिंग नाव दिले आहे. नवीन अपडेट देण्यामागचा गुगलचा उद्देश युजर्सला नैसर्गिक अनुभव देणे हा आहे. गुगल मॅप्सचे हे नवीन अपडेट जगभरातील 220 देशांमध्ये दिसेल. हे फीचर एचएसव्ही कलर मॉडेलवर काम करेल.

दरम्यान, गुगल आपल्या युजर्सला अधिक चांगली सुविधा देण्यासाठी एका नवीन फीचरचे टेस्टिंग करत आहे. लवकरच गुगल मॅप्स युजर्सला ट्रॅफिक सिग्नलबाबत देखील माहिती देईल. मागील महिन्यापासून या फीचरचे टेस्टिंग सुरू आहे.

ज्याप्रमाणे गुगल रस्त्यावरील ट्रॅफिकची माहिती देते, त्याच प्रमाणे ट्रॅफिक सिग्नल लाल आहे की हिरवा याची माहिती देईल. लवकरच हे फीचर रोल आउट होणार आहे.