महिलेने चक्क चॉकलेटपासून बनवली कोव्हिड थीमची गणरायाची मुर्ती

यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट आहे. असे असले तरी लोक उत्साहात गणरायाच्या आगमनाची वाट पाहत आहे. मध्य प्रदेशच्या इंदुर येथे राहणाऱ्या एक महिलेने श्री गणेशाची चॉकलेटची मुर्ती बनवली आहे. महिलेने कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर कोरोना व्हायरस थीमवर आधारित प्रतिमा बनवली आहे.

निधी शर्मा नावाच्या या महिलेने आपल्या या थीममधून कोव्हिड-19चे वॉरियर्स, डॉक्टर आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. निधी यांनी याबाबत सांगितले की, मी चॉकलेटपासून श्री गणेशाची मुर्ती तयार केली आहे. आम्हाला वाटते की गणरायाच्या कृपेने आपण कोव्हिड-19 शी लढू शकतो. या थीमच्या आधारावर आम्ही डॉक्टर आणि पोलीसांच्या मुर्ती देखील बनवल्या.

त्यांनी सांगितले की, चॉकलेटचा एक छोटा चेंडू बनवून कोरोना व्हायरसला देखील दर्शवले. आम्ही दर्शवले की गणपती त्रिशूलने कोरोना व्हायरसला नष्ट करत आहे. या प्रतिमेवर त्यांना कोरोना गो देखील लिहिले. ही चॉकलेटची मुर्ती दूधात विसर्जित करणार आहेत.