इंस्टाग्रामने आणले क्यूआर कोड फीचर, असा तयार करा तुमचा क्यूआर कोड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत आहे. आता कंपनीने क्यूआर कोड सपोर्ट देणे सुरू केले आहे. अनेक दिवसांपासून याचे टेस्टिंग सुरू होते, अखेर आता हे फीचर रोल आउट करण्यात आले आहे. हे क्यूआर कोड कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅपने स्कॅन करता येईल. इंस्टाग्राम ओपन न करता क्यूआर कोड स्कॅन करून थेट युजर्सच्या अकाउंटवर जाता येते. ज्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यात इनबिल्ट क्यूआर कोड स्कॅनर आहे, त्याद्वारे देखील स्कॅन करणे शक्य आहे.

क्यूआर कोडला इंस्टाग्राम युजर्स आपल्या कार्डवर देखील प्रिंट करू शकतात. क्यूआर कोड जनरेट करणे देखील खूपच सोपे असून, इंस्टाग्रामने यासोबत काही फीचर्स देखील दिले आहेत ज्यामुळे तुम्ही आपल्या प्रोफाईलच्या क्यूआर कोडला कस्टमाइज करू शकतात.

असा करा क्यूआर कोड जनरेट –

आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला उघडल्यावर सेटिंग्समध्ये जा. येथे क्यूआर कोडचा पर्याय दिसेल. त्यावर टॅप करा. टॅप केल्यावर तुम्हाला यूजरनेमसह क्यूआर कोड इमेज दिसेल. तुम्ही क्यूआर कोडचा बॅकग्राउंड फोटो देखील बदलू शकता. येथे तुम्ही तुमचा फोटो देखील लावू शकता. कस्टमाइज केल्यानंतर तुम्ही क्यूआर कोड गॅलेरीत सेव्ह करू शकता किंवा इतरांना देकील शेअर करू शकता.