शत्रूला भनकही न लागता लडाख पोहचणार भारतीय सैन्य, करणार नवीन रस्त्याचे निर्माण

लडाख सीमेवर सैन्य लवकर पोहचावे यासाठी भारत एका नवीन रस्त्याची निर्मिती करणार आहे. मनाली आणि लेह दरम्यान तयार करण्यात येणाऱ्या या रस्त्याची निर्मिती सरकारद्वारे केली जाणार आहे. लडाख व अन्य भागात कनेक्टिव्हिटी अधिक चांगली करण्यासाठी वेगाने काम सुरू आहे. रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या भागात सैन्य लवकर पोहोचण्यासाठी पायाभूत सुविधा तयार केल्या जात आहेत.

एएनआयच्या वृत्तानुसार, मनाली ते लेहपर्यंत पर्यायी कनेक्टिव्हिटीसाठी संस्था काम करत आहेत. नवीन रस्त्यामुळे सैन्याला लडाखपर्यंत पोहचण्यासाठी कमी वेळ लागेल. आतापर्यंत श्रीनगरच्या जोजिला पास आणि अन्य रस्त्यांचा वापर करून सैन्य लडाखला जात असे. मात्र नवीन रस्त्यामुळे 3-4 तास वाचतील व पाकिस्तान-चीन सैन्याच्या हालचालींवर लक्ष देखील ठेवू शकणार नाही. याच मार्गाद्वारे सैन्याला टँक आणि शस्त्र सहज पोहचवता येतील.

सध्याच्या द्रास-कारगिल-लेहच्या रस्त्याला पाकिस्तानकडून 1999 च्या कारगिल युद्धावेळी निशाणा बनविण्यात आले होते. नवीन रस्त्याचे काम सुरू देखील करण्यात आल्याचे सांगितले जाते.