‘राहुल गांधींसाठी पंतप्रधानपद सोडण्यास तयार होते मनमोहन सिंह, मात्र…’, काँग्रेसचा खुलासा

एका पुस्तकात छापून आलेल्या मुलाखतीमध्ये काँग्रेस पक्षातील नेतृत्वाबाबत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी राहुल गांधींनी सांगितल्याप्रमाणे आमच्या कुटुंबियांपैकी कुणीही काँग्रेसचा अध्यक्ष होऊ नये, त्यांच्या या मताशी मी देखील सहमत असल्याचे म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसने माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्याबाबत मोठा खुलासा केला आहे. काँग्रेसने म्हटले आहे की, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह हे राजीनामा देण्यास आणि राहुल गांधींसाठी रस्ता करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र राहुल गांधी यांनी पद घेण्यास नकार दिला. याबाबत एनडीटिव्हीने वृत्त दिले आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते शक्ति सिंह गोहिल यांनी मनमोहन सिंह यांच्याबाबत खुलासा करताना सांगितले की, मनमोहन सिंह हे आपले पद सोडण्यास तयार होते. मात्र राहुल गांधींनी ते स्विकारले नाही. हे तेच दर्शवते की आपल्या कुटुंबाप्रमाणेच राहुल गांधी सत्तेसाठी कधीही उतावळे नव्हते.

दरम्यान, प्रियंका गांधी यांचे हे विधान एक वर्ष जुने असून, मीडिया यात का रस दाखवत आहे या मागचा खेळ आम्ही समजतो, असे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की हे टिप्पणी 1 वर्ष जुनी आहे. ते म्हणाले की, काँग्रेसचे लाखो कार्यकर्ते राहुल गांधींच्या अथक संघर्ष आणि संकल्पाचे साक्ष्य आहेत. त्यांनी कधीही कोणत्याही विपरित स्थितीची व मोदी सरकारच्या घाणेरड्या हल्ल्याची चिंता केली नाही. याच निर्भयतेची काँग्रेसच नाही तर देशालाही सर्वाधिक गरज आहे.

सुरजेवाला यांनी ट्विट केले की, नेहरू-गांधी कुटुंबाने नेहमीच सत्तेच्या लोभापासून लांब, सेवाभावेने काँग्रेसला एका सूत्रात बांधून ठेवले. 2004 मध्ये सोनिया गांधींनी सत्तेच्याऐवजी पक्षाची सेवा निवडली. 2019 मध्ये देखील राहुल गांधींनी दृढ विश्वासाची हिंमत दाखवत काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.