3 विमानतळांच्या खाजगीकरणाला केंद्राची मंजूरी, 50 वर्षांसाठी भाडेतत्वावर देणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत विमानतळांच्या खाजगीकरणाला मंजूरी देण्यात आली आहेय मंत्रीमंडळाने जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम विमानतळांना पीपीई मॉडेल अंतर्गत भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. ही विमानतळे 50 वर्षांसाठी भाडेतत्वावर दिली जातील.

केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी माहिती देत सांगितले की, यातून 1070 कोटी रुपये मिळतील. या रक्कमेचा उपयोग विमानतळ प्राधिकारण छोट्या शहरांमध्ये विमानतळांची निर्मिती करण्यासाठी करेल. सोबतच प्रवाशांना देखील अनेक सुविधा मिळतील. केंद्र सरकारने मागील वर्षी सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीई) मॉडेल अंतर्गत लखनऊ, अहमदाबाद, जयपूर, मंगळुरू, तिरुअनंतपुरम आणि गुवाहाटी येथील विमानतळांचे संचालन, व्यवस्थापन आणि विकासासाठी खाजगीकरण केले होते.

विमानतळे भाडेतत्वावर दिल्याने खाजगी गुंतवणूक वाढेल असे सांगितले जात आहे. विमानतळाच्या संचालनासाठी होणारे नुकसान देखील कमी होईल. देशात विमानतळ प्राधिकरणाचे 100 पेक्षा अधिक विमानतळे असून, त्यातील 90 पेक्षा अधिक तोट्यात आहेत.