सुशांत प्रकरण : सीबीआय टीमला देखील क्वारंटाईन करणार ? मुंबई महापालिकेने दिले स्पष्टीकरण

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर आता सीबीआयची एक टीम मुंबईत येणार आहे. सुशांतच्या वडिलांनी तक्रारीनंतर बिहार पोलिसांद्वारे एफआयआर नोंदवल्यानंतर तपासासाठी आतापर्यंत सीबीआयटी टीम मुंबईला आलेली नाही. सीबीआयच्या प्रवक्त्यांनी पुढील तपासासाठी टीम मुंबईला जाणार असल्याचे सांगितले. मात्र बिहार पोलीस अधिकाऱ्याप्रमाणेच या टीमला देखील मुंबई महानगरपालिका क्वारंटाईन करणार का ? असा प्रश्न निर्माण झाला होता. यावर आता महापालिकेने स्पष्टीकरण दिले आहे.

मुंबई महानगरपालिकेच आयुक्त इक्बाल सिंह म्हणाले की, सीबीआयची टीम 7 दिवसांसाठी मुंबईला येत असल्यास त्यांना क्वारंटाईनमध्ये सूट मिळेल. मात्र त्यांना अधिक दिवस थांबायचे असल्यास ईमेल आयडीच्या माध्यमातून अर्ज करावा लागेल.

महानगरपालिकेचे आयुक्त म्हणाले की, सीबीआयकडे कंफर्म रिटर्न तिकिट असल्यास त्यांना आपोआप क्वारंटाईन नियमात सूट मिळेल. सात दिवसांपेक्षा अधिक दिवस येते राहणार असतील तर त्यांना ईमेलद्वारे सूट मागावी लागेल व त्यांना सूट दिली जाईल.