भगतसिंह कोश्यारींनी घेतली गोव्याच्या राज्यपाल पदाची शपथ

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. त्यांच्याकडे महाराष्ट्रासह आता गोव्याचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांना मेघालयाचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

भगतसिंह कोश्यारी यांनी पणजीमध्ये कोकणी भाषेत शपथ घेतली. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद महाजन म्हणाले की गोवा सरकार आणि जनतेतर्फे मी राज्यपालांचे स्वागत करतो. भगतसिंह कोश्यारी हे सप्टेंबर 2019 पासून महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत.

दरम्यान, गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांना मेघालायचे नवे राज्यपाल बनविण्यात आले आहे. तथागत रॉय यांची ते जागा घेतील. रॉय हे 3 वर्ष त्रिपुरा आणि 2 वर्ष मेघालयाचे राज्यपाल होते.