संपूर्ण जगाला ‘कामा’ला लावून, चिन्यांची सुरु आहे ‘चंगळ’


संपूर्ण जगावर कोरोनाचे दुष्ट संकट ओढावले असून या महामारीने जगभरातील जवळपास सव्वा दोन कोटींच्या आसपास लोकांना आपल्या विळख्यात घेतले आहे, तर पावणे आठ लाखांहून अधिक लोकांनी आपले जीव गमावले आहेत. त्यातच कोरोना या महामारीचा प्रसार चीनच्या वुहानमधून संपूर्ण जगात झाला. युरोप, अमेरिका, ब्राझीलमध्ये थैमान घातल्यानंतर आता या रोगाची वक्रदृष्टी आपल्या देशाकडे झाली असून २७ लाखांच्या पुढे भारतातील कोरोना बाधितांचा आकडा गेला आहे. तर ५० हजारांहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे.

YouTube

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, जगभरातील बहुतांश देशांमध्ये अद्यापही लॉकडाऊन लागू आहे. त्याचबरोबर सुरक्षितेचे उपाय म्हणून घराबाहेर पडताना मास्क लावणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे, वारंवार हात धुणे अशा गोष्टींची अवलंब केला जात आहे. पण दुसरीकडे ज्या ठिकाणी या दुष्ट रोगाचा उगम झाला, तेथे असले काहीच प्रकार होत नसल्याचे काही व्हायरल झालेल्या फोटोंवरुन स्पष्ट होत आहे.

NewzTech20

कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षी वुहानमधून जगभरात झाला. पण सोशल मीडियावर सध्या वुहानमधील काही फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये वुहानचे नागरिक मौजमजा तसेच पार्टी करताना दिसत आहेत.

संपूर्ण जग एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मास्कचा वापर, त्याचबरोबर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत असताना दुसरीकडे असले काहीच वुहानच्या पार्टीत होत नसल्याचे फोटोमध्ये दिसत आहे.

cnn.com

एका इलेक्ट्रॉनिक म्युझिक फेस्टिवलचे आयोजन वुहानच्या माया बीच वॉटर पार्कमध्ये करण्यात आले होते. यामध्ये शेकडो चिन्यांनी उपस्थिती दर्शवली. यासंदर्भात स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, म्युझिक फेस्टिवलवेळी वॉटर पार्कमध्ये उपस्थित असलेल्यांचे प्रमाण पार्कच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के होते. त्याचबरोबर ५० टक्क्यांची सूट महिलांना देण्यात आली होती. पार्कमध्ये उपस्थित असल्यांपैकी कोणीही मास्क घातलेला नव्हता.

cnn.com

संपूर्ण जग कोरोनामुळे कामाला लागलेले असताना वुहानचे नागरिक मात्र चंगळ करत असतानाचे चित्र सध्या दिसत आहे. वुहानमध्ये गेल्या वर्षी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला.

cnn.com

कोरोना रुग्ण सापडताच १ कोटीपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या वुहान शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. जवळपास ७६ दिवस शहरात लॉकडाऊन सुरू होता. वुहानमधील लॉकडाऊन जूनमध्ये संपुष्टात आला. कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आल्याने स्थानिक प्रशासनाने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी शहरात लागू असलेले सर्व निर्बंध हटवले होते.