विघ्नहर्त्या गणेशाची विविध रूपे


घराघरातून गणपतीरायांचे लवकरच आगमन होणार आहे. वेगवेगळ्या रूपात संकटनाशक गणपती आपल्याला ज्ञात आहे. गणेशाची रूपे जशी अनेक तशीच त्याची नांवही अनेक. शास्त्रांत मात्र गणेशाची ३२ रूपे वर्णन केली गेली आहेत. अर्थात सर्व रूपात तो बुद्दीदाता, विघ्नहर्ता व मंगलकारक गणेशच आहे.यातील कांही रूपे खालीलप्रमाणे आहेत. शास्त्रात गणेशाची जी रूपे वर्णन केली गेली आहेत त्याची खास कांही वैशिष्ठ्येही आहेत. कोणती आहेत ही रूपे?

१) बाल गणपती- सहा हात असलेला लाल रंगाचा गणेश हे बालगणपतीचे रूप आहे.
२) तरूण गणपती- याला आठ भुजा म्हणजे हात व त्याचा वर्ण आहे रत्त*वर्ण
३)भक्त गणपती- याला चार हात व पांढरा वर्ण दिला गेला आहे.
४)वीर गणपती- हा दहा हातांचा व रक्तवर्णाचा गणेश आहे.
५)शक्ती गणपती- हा चार हात असलेला व कुंकु रंगाचा गणपती आहे.

६)द्विज गणपती- हा चार हातांचा व शुभ्र वर्णाचा आहे.
७)सिद्धी गणपती- हा सहा हातांचा व पिंगाल वर्णाचा आहे.
८)विघ्न गणेश- हा दहा हातांचा व सोनेरी वर्णाचा आहे.
९)उच्चिष्ठ गणेश- हा चार हातांचा व निळ्या रंगाचा आहे.
१०) हेरंब गणेश- हा आठ हातांचा व गौर वर्णाचा आहे.

११)उद्ध गणपती- हा सहा हातांचा व सोन्याच्या वर्णाचा आहे.
१२)क्षिप्र गणेश- हा सहा हातांचा रक्तवर्णी आहे.
१३)लक्ष्मी गणेश- हा आठ भुजांचा व गौर वर्णाचा आहे.
१४) विजय गणेश- हा चार भुजांचा व रक्त वर्णी आहे.
१५) नृत्य गणेश – हा सहा भुजांचा व रक्ताच्या वर्णाचा आहे.

१६)एकाक्षर गणेश – हा चार भुजांचा व रक्त वर्णाचा आहे.
१७) हरिद्रा गणेश- सहा हातांचा व पिवळ्या वर्णाचा आहे.
१८)त्र्यैक्ष गणेश- हा सोनेरी रंगाचा तीन डोळ्यांचा व चार भुजांचा आहे.
१९)वर गणेश- हा सहा हात असलेला रक्तवर्णाचा आहे.
२०)ढुण्डी गणेश – हा चार भुजांचा व रक्तवर्णी आहे.

Leave a Comment