आमिरवर टीका करणाऱ्यांवर संतापल्या ‘या’ लेखिका; म्हणाल्या त्याजागी अक्षय असता तर विरोध केला असता का?


आपल्या आगामी लाल सिंह चड्ढा या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सध्या तुर्कस्तानमध्ये असून या दरम्यान त्याने तुर्कीच्या फर्स्ट लेडी एमीन एर्दोगान यांची भेट घेतली. पण आमिरची भेट काही भारतीय नेटकऱ्यांच्या पचनी पडली नाही आणि सोशल मीडियाद्वारे त्यांनी आमिर खानवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली.

दरम्यान आमिरला पाठिंबा देत त्याच्यावर टीका करणाऱ्यांवर जेष्ठ पत्रकार आणि लेखिका सबा नक्वी यांनी निशाणा साधला. जर आमिरच्या जागी अक्षय कुमार असता तर त्याला देखील तुम्ही असाच विरोधच केला असता का? असा सवाल त्यांनी टीकाकारांना विचारला आहे.

लालसिंह चड्ढा या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण सध्या तुर्कीत सुरु आहे. याच दरम्यान त्याने तुर्कीच्या राष्ट्रपतींच्या पत्नी एमीन एर्दोगान यांची भेट घेतली. आमिरच्या एमीन या खूप मोठ्या फॅन आहेत. त्यांनी एक ट्विट करुन या भेटीसाठी आमिरचे आभार मानले. प्रसिद्ध भारतीय अभिनेता, निर्माता आमिर खान यांची आज मी भेट घेतली. त्यांना भेटून खूपच आनंद झाला. ते आमच्या देशात लाल सिंह चड्ढा चित्रपटाचे चित्रीकरण करत असल्याचे एक ट्विट त्यांनी केले होते.