सरकारने लाँच केले स्वदेशी ‘मायक्रोप्रोसेसर चॅलेंज’, मिळणार 2.30 कोटींचा इनाम

आत्मनिर्भर भारत अ‍ॅप इनोव्हेशन चॅलेंजनंतर आता भारत सरकारने स्वदेशी मायक्रोप्रोसेसर चॅलेंज (Microprocessor Challenge) लाँच केले आहे. स्वदेशी मायक्रोप्रोसेसर चॅलेंज अंतर्गत स्मार्ट डिव्हाईससाठी हार्डवेअर तयार करावे लागेल. हे चॅलेंज अ‍ॅप इनोव्हेशन चॅलेंज सारखेच आहे, ज्यात कंपन्या भाग घेऊ शकतील. या चॅलेंज अंतर्गत 25 विजेत्यांना कोट्यावधी रुपयांचे इनाम मिळेल.

हे चॅलेंज मायगव्हने लाँच केले असून, हे चॅलेंज आत्मनिर्भर भारत अभियानाचाच एक भाग आहे. या अंतर्गत सर्व्हिलांस, ट्रांसपोर्टेशन, इनव्हायरलमेंटल कंडिशन मॉनिटरिंग, स्मार्ट फॅन, स्मार्ट लॉक आणि वॉशिंग मशीनसाठी हार्डवेअरची निर्मिती करावी लागेल. याअंतर्गत संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रासाठी देखील हार्डवेअरची निर्मिती करता येईल.

हे चॅलेंज सी-डॅक, आयआयटी मद्रास आणि आयआयटी बॉम्बे येथे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वतीने संचालित केले जाईल.

हे चॅलेंज 10 महिने चालेल. 18 ऑगस्टपासून नोंदणी सुरू झाली असून, 15 सप्टेंबरपर्यंत नोंदणी सुरू राहील. यानंतर 16 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान क्वाटर फायनल, 1 जानेवारी ते 15 मार्च 2021 दरम्यान सेमी फायनल आणि 1 एप्रिल ते 15 जून 2021 या कालावधीमध्ये अंतिम टप्पा पुर्ण होईल. अखेर 25 टीमला निवडले जाईल व यातून 21 जुलैला शेवटच्या 10 विजेत्यांची घोषणा केली जाईल. विजेत्यांना 2.30 कोटी रुपयांचा फंड व 12 महिने सरकारकडून मदत मिळेल.