पुण्यातील अर्ध्या लोकसंख्येला होऊनही गेला कोरोना ? सर्वेक्षणात 51.5 % नमुन्यात आढळले अँटीबॉडी

कोरोनाने सर्वाधिक प्रभावित असलेल्या पुण्यातील 51.5 टक्के लोकांच्या शरीरात कोरोनाच्या अँटीबॉडीज आढळल्या आहेत. सिरो सर्वेक्षणामध्ये ही माहिती समोर आली आहे. सर्वेक्षणाचा हा निष्कर्ष धक्का आहे, कारण कोव्हिड अँटीबॉडी असण्याचा अर्थ व्यक्तीला आधीच कोरोनाची लागण झाली होती. म्हणजेच शहरातील अर्ध्या लोकसंख्याला कोरोना होऊनही गेला आहे.

सिरो सर्वेक्षणासाठी महानगर पालिकेने सर्वाधिक प्रभावित 5 भागातून 1644 नमुने घेतले होते. या भागांमध्ये कोरोनाची लागण होण्याचा दर 36.1 टक्के ते 65.4 टक्के आहे. भवानी पेठेच्या वॉर्डांतर्गत येणाऱ्या लोहियानगर-कासेवाडी हा भाग सर्वाधिक प्रभावित आहे. सर्वेक्षण टीमचा भाग असलेले वरिष्ठ संशोधक अर्णब घोष यांच्यानुसार, तपासणीमध्ये या भागांमध्ये कोरोना संसर्ग सर्वाधिक पाहण्यास मिळाला. हे सर्वक्षण पुणे महानगरपालिका आणि भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेने (आयसीएमआर) मिळून केले. शरीरात सार्स-कोव्ह-2 च्या तुलनेत IgG अँटीबॉडी अधिक आढळल्या.

1 जुलैपर्यंत आढळलेल्या कोरोना रुग्णांचा अंदाज घेऊन 20 जुलै ते 5 ऑगस्ट दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले. राहण्याची व्यवस्थित सोय असलेल्यांमध्ये अँटीबॉडीज सापडल्या. बंगल्यात राहणाऱ्या 49 टक्के लोकांमध्ये, झोपडीत राहणाऱ्या 56 ते 62 टक्के, अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या 33 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज सापडल्या.

सर्वेक्षणाचा भाग असलेल्या 52.8 टक्के पुरूष आणि 50.1 टक्के स्त्रियांच्या शरीरात कोव्हिड-19 अँटीबॉडी तयार झाल्याचे आढळले. सार्वजनिक शौचालय वापरणाऱ्या 62.2 टक्के आणि स्वतंत्र शौचालय असणाऱ्या घरांमध्ये राहणाऱ्या 45.3 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या.