टी-सिरीज आणि ‘तानाजी’ फेम ओम राऊतच्या आगामी चित्रपटात झळकणार प्रभास


टी-सिरीजचे भूषण कुमार आणि ‘तानाजी’ फेम दिग्दर्शक ओम राऊत यांच्या आगामी चित्रपटात बाहुबली प्रभास मुख्य भूमिकेत झळकणार असून त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव आदिपुरुष असे असून नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रभासने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. हा चित्रपट एक थ्रीडी अॅक्शन ड्रामा असेल. तसेच हिंदी सहित तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नडमध्ये हा चित्रपट रिलीज करण्यात येणार आहे. २०२२ मध्ये हा चित्रपट रिलीज होण्याची शक्यता आहे.

प्रभासने ‘आदिपुरूष’चं पोस्टर शेअर करत लिहिले की, वाईटावर मात करण्याचा आनंद साजरा करताना… असे म्हटले आहे. प्रभास या चित्रपटात आदिपुरूष ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर जरी रिलीज केले असले तरी यातील प्रभासच्या लूकबाबत अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. मंगळवारी सकाळी ७ वाजून ११ मिनिटांनी प्रभासच्या या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. तत्पूर्वी प्रभासने एक व्हिडीओ शेअर करत या चित्रपटाच्या घोषणेबाबतचे संकेत दिले होते.