जिओचे मोठे गिफ्ट, फीचर फोनमधून करता येणार यूपीआय पेमेंट

रिलायन्स जिओने आपल्या जिओ फोन युजर्सला मोठे गिफ्ट देत यूपीआय सपोर्ट देणे सुरू केले आहे. म्हणजेच आता जिओच्या फीचर फोनमध्ये देखील स्मार्टफोन यूजर्सप्रमाणे यूपीआय पेमेंट करू शकणार आहेत. मागील अनेक महिन्यांपासून या फीचरचे टेस्टिंग सुरू होते.

बीजीआरच्या रिपोर्टनुसार जिओ फोन युजर्सला यूपीआयचा सपोर्ट जिओ पे अ‍ॅपमध्ये मिळत आहे. सध्या हे फीचर्स ठराविकच युजर्सला मिळाले असून, हळूहळू अन्य लोकांना देखील याचा सपोर्ट मिळेल. जिओ पे मध्ये यूपीआयच्या सपोर्टसाठी जिओने एनपीसीआयसोबत भागीदारी केली आहे.

जिओ पे मध्ये यूपीआयचा सपोर्ट मिळणे मोठी गोष्ट आहे. कारण फीचर फोनमध्ये डिजिटल पेमेंट अवघड आहे, मात्र जिओने हे करून दाखवले. कंपनीने जिओ फोनला 2017 मध्ये लाँच केले होते. हा एक 4जी फीचर फोन आहे. युजर्स आता जिओ पे द्वारे युजर्सच्या नावावर क्लिक करून पैसे पाठवू शकतात, बिल भरू शकतात आणि मोबाईल रिचार्ज देखील करू शकतात.