चीनसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर हवाई दलाने पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवर तैनात केले ‘तेजस’

स्वदेशी फायटर एअरक्राफ्ट प्रोग्राममध्ये भारतीय हवाई दलाने एक मोठी कामगिरी केली आहे. चीनसोबतच्या तणासाच्या पार्श्वभूमीवर आता हवाई सुरक्षेला अधिक मजबूत बनविण्यासाठी स्वदेशी बनावटीचे लढाऊ तेजस विमानाला पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवर तैनात केले आहे. शत्रूद्वारे करण्यात येणाऱ्या कोणत्याही हालचालींना त्वरित उत्तर देण्यासाठी तेजस विमानाला येथे तैनात करण्यात आले आहे.

तेजस 45व्या स्क्वॉड्रन एअर कमांड अंतर्गत सुलूर येथे तैनात आहे. तेजसला येथे ऑपरेशन रोलसाठी तैनात करण्यात आले आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पंतप्रधान मोदींनी देखील लाल किल्ल्यावरून स्वदेशी तेजस लढाऊ विमानांचे कौतुक केले होते.

एकीकडे तेजस लढाऊ विमानांचे पहिले स्क्वॉड्रन इनिशियल ऑपरेशनल क्लियरेंस व्हर्जन आहे. तर दुसरे स्क्वॉड्रन (18 स्क्वॉड्रन) फायनल ऑपरेसनल क्लियरेंस व्हर्जन आहे. हवाई दल आणि संरक्षण मंत्रालय याच वर्षी 83-मार्क 1ए एअरक्राफ्ट खरेदीचा करार पुर्ण करण्याची शक्यता आहे.

सीमेवर चीनसोबतचा वाढता संघर्ष पाहता आता हवाई दलाने चीनसोबतच पाकिस्तानच्या सीमेवर देखील सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी लढाऊ विमाने तैनात केली आहेत.