गौरवास्पद! जॅकलीन फर्नांडिसने घेतली महाराष्ट्रातील दोन गावे दत्तक


श्रीलंकन ब्यूटी आणि बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने एक गौरवास्पद काम केले असून जे ऐकून तुम्ही देखील तिचे कौतुक कराल. वाढदिवसाचे औचित्य साधत जॅकलीनने महाराष्ट्रातील दोन गावे जॅकलीनने दत्तक घेतली आहे. यासाठी तिने ‘अॅक्शन अगेन्स्ट हंगर फाऊंडेशन’सोबत करार केला असून त्यानुसार ती पाथर्डी आणि सकुर या गावातील १५०० लोकांची तीन वर्षांसाठी ती मदत करणार आहे.

जॅकलीनने गावे दत्तक घेण्याबाबत माहिती देताना सांगितले की, माझ्या मनात खूप आधीपासूनच असा सामाजिक उपक्रम करण्याचे होते. अनेकांसाठी हे वर्ष कोरोनाच्या संकटामुळे फार त्रासदायक जात आहे. मी दत्तक घेतलेल्या या दोन गावांतील जवळपास १५५० लोकांपर्यंत आम्ही मदत पोहोचवणार आहोत. त्याचबरोबर गावातील महिलांना गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत वैद्यकीय सहाय्य देण्यात येईल. त्याचबरोबर कुपोषित मुलांची देखभाल करण्यात येईल. तसेच गावात किचन गार्डन बांधण्यात येईल. लोकांची मदत सर्व सुचनांचे पालन करून आणि सुरक्षेची काळजी घेऊन केली जाईल.