या ठिकाणी नोंदवले गेले मागील 100 वर्षातील सर्वाधिक तापमान

जगातील सर्वाधिक तापमानाचा रेकॉर्ड अमेरिकेत नोंदवला गेला असून, येथील कॅलिपोर्नियाच्या डेथ व्हॅलीमध्ये रविवारी दुपारी तापमान तब्बल 130 डिग्री (फॅरेनहाइट) नोंदवले गेले. हा सर्वोच्च तापमानाचा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे.

अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान खात्याने माहिती दिली की, डेथ व्हॅलीचे तापमान रविवारी तब्बल 130 डिग्री होते. हवामान खात्याने सांगितले की, या तापमानाची पुष्टी झाल्यास हे आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाचा रेकॉर्ड 3 डिग्रीच्या अंतराने मोडेल.

वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन वेदर अँड क्लायमॅट टीमचे रेंडी कार्नव्हे म्हणाले की, मी आतापर्यंत जे पाहिले आहे त्यानुसार हे वैध अवलोकन आहे. मी या प्राथमिक निरिक्षणाला स्विकार करण्यासाठी वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनला शिफारस करत आहे. पुढील काही आठवड्यांमध्ये आम्ही अमेरिकेच्या नॅशनल क्लायमेट एक्सट्रीम कमेटीसोबत मिळून याची तपासणी करू.

डेथ व्हॅलीच्या नावावर पृथ्वीवरील सर्वाधिक तापमानाचा रेकॉर्ड असून, येथे 10 जुलै 1913 ला येथे 134 डिग्री तापमान होते. मात्र या निरिक्षणाबाबत अनेक प्रश्न आहेत. या तापमानाला वैज्ञानिक खरे मानत नाही. त्यामुळे डेथ व्हॅलीमध्ये सध्या नोंदवण्यात आलेले तापमान शतकातील सर्वाधिक असण्याची शक्यता आहे.