7 वर्षांपुर्वीच चीनमध्ये पसरला होता कोरोना, वैज्ञानिकांचा धक्कादायक दावा

चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. मागील अनेक महिने लॉकडाऊन आणि त्यानंतर अनलॉकच्या प्रक्रियेतून अनेक देश जात आहे, असे असले तरी या व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यात अद्याप यश आलेले नाही. आता वैज्ञानिकांनी धक्कादायक दावा केला असून, त्यांचे म्हणणे आहे की 7 वर्षांपुर्वी म्हणजेच 2012 मध्येच चीनमधील खाणीत काम करणाऱ्या काही मजूरांना या व्हायरसची लागण झाली होती. या मजूरांमध्ये आजच्या कोरोना व्हायरसची लक्षणे आढळली होती.

अमर उजालाच्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी सांगितले की वर्ष 2012 मध्ये चीनच्या दक्षिण पश्चिमच्या युन्नान प्रांतातील मोजियांग खाणीत सहा मजूरांना वटवाघळांचा मल साफ करण्यासाठी पाठवले होते. ते 14 दिवस त्या खाणीत होते. यानंतर त्यांच्यात ताप, खोखला, हात-पाय दुखणे आणि डोकेदुखी यासारखी लक्षणे आढळली होती. यातील 3 मजूरांचा मृत्यू झाला होता. संक्रमित मजूरांवर उपचार चीनचे डॉक्टर ली सू यांनी केले होते.

ली सू यांनी याबाबत एक थिसिस देखील लिहिले होते. त्यांचा दावा आहे की मजूरांचे सॅम्पल टिश्यू वुहानच्या लॅबमध्ये पाठवण्यात आले होते. या लॅबमध्ये वटवाघळांमध्ये आढळणाऱ्या धोकादायक व्हायरसवर संशोधन होते व येथूनच व्हायरस लीक झाला.

वुहानमध्ये कोव्हिड-19 मुळे मृत्यू झाल्याचे पहिले प्रकरण 11 जानेवारी 2020 ला समोर आले होते. यानंतर 9 दिवसात व्हायरस जपान, दक्षिण कोरिया आणि थायलंडमध्ये पसरला.