टेलिग्रामने आणले व्हॉट्सअ‍ॅपच्या तोडीसतोड फिचर

व्हॉट्सअ‍ॅपचा प्रतिस्पर्धी असलेल्या इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप टेलिग्रामने आपल्या अँड्राईड आणि आयओएस युजर्ससाठी व्हिडीओ फीचर लाँच केले आहे. अनेक दिवसांपासून या फीचरची चर्चा सुरू होती. अखेर टेलिग्रामला 7 वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने हे फीचर रोल आउट करण्यात आले. टेलिग्रामचे हे फीचर अल्फा व्हर्जनवर जारी करण्यात आले आहे.

कंपनीनुसार व्हिडीओ कॉलिंग एंड टू एंड एंक्रिप्टेड आहे. याच्या टेस्टिंगसाठी कंपनीने यामध्ये इमोजी मॅजिक फीचर देखील दिले आहे. लवकरच ग्रुप व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच करणार असल्याची माहिती टेलिग्रामने दिली.

टेलिग्रामने या नवीन फीचरबाबत सांगितले की, हे पिक्चर टू पिक्चर म्हणजेच पीआयपी मोडला सपोर्ट करेल. याचा फायदा असा होईल की, युजर व्हिडीओ चॅटला स्क्रॉलकरून अन्य कामे देखील मोबाईलवर करू शकेल. व्हिडीओ कॉलिंग करताना तुम्हाला स्क्रिनवर 4 इमोजी देखील दिसतील. जर हे इमोजी दिसले नाही तर तुमचा कॉल सुरक्षित नाही.