मलेशियात आढळला 10 पट अधिक धोकादायक कोरोनाचा नवीन प्रकार

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा एक नवीन प्रकार मलेशियाच्या संशोधकांना आढळला असून, हा प्रकार सामन्यपेक्षा 10 पट अधिक धोकादायक आहे. कोरोनाच्या या 10 पट अधिक संसर्गाचा धोका असणाऱ्या प्रकाराला डी 614जी नावाने ओळखले जाते. या व्हायरसचा संसर्ग मलेशियातील एका हॉटेल मालकाला झाला असून, भारतातून परतल्यानंतर या व्यक्तीला 14 दिवस क्वारंटाईन नियम न पाळल्याने संसर्ग सुरू झाला.

क्वारंटाईनचे नियम तोडल्याने या व्यक्तीला 5 महिन्यांचा कारावास आणि दंडाची शिक्षा देण्यात आली आहे. असाच प्रकार फिलिपाईन्समधून परतलेल्या समूहामध्ये आढळला. ज्यातील 45 पैकी 3 लोकांमध्ये कोरोनाचा प्रकार आढळला.

अमेरिकेचे वरिष्ठ आरोग्य सल्लागार डॉ. फौसी म्हणाले की, या प्रकारमुळे कोरोना व्हायरसचा प्रसार अधिक वेगाने होऊ शकतो. मलेशियाच्या आरोग्य विभागाचे डायरेक्टर जनरल नूर हिशाम अब्दुल्ला म्हणाले की, नवीन व्हायरसच्या प्रकाराचे गंभीर परिणाम पाहण्यास मिळू शकतात. यामुळे आतापर्यंत लस बनविण्यासाठी आणि संसर्ग रोखण्यासाठी विकसित तंत्र देखील अपयशी ठरू शकते. लोकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. लोकांच्या सहकार्याची गरज असून, जेणेकरून संसर्गचा साखळी तोडता येईल.

कोरोना व्हायरसचा हा नवीन प्रकार अमेरिका आणि यूरोपमध्ये वागने पसरत आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले की, आतापर्यंत असा कोणताही पुरावा आढळलेला नाही की ज्यामुळे सिद्ध होते कोरोनाचा नवीन प्रकार मनुष्याला अधिक गंभीर आजार देऊ शकतो.