चीनला मोठा व्यवसायिक झटका, 24 मोबाईल कंपन्या भारतात येण्याच्या तयारीत

चीनला झटका देण्यासाठी भारत एकामागोमाग एक पावले उचलताना दिसत आहे. भारताला यात यश देखील मिळत आहे. आता चीनमधील आपला व्यवसाय बंद करू इच्छिणाऱ्या मोबाईल फोन निर्मात्या कंपनी भारतात आपल्या फॅक्ट्र्या सुरू करण्याचा विचार करत आहे.

अमेरिका आणि चीनमधील वाढता व्यापार संघर्ष आणि कोरोना व्हायरस महामारीच्या संकटामुळे कंपन्या आपल्या पुरवठा साखळीमध्ये बदल करू इच्छित आहेत. याच कारणामुळे कंपन्या चीनच्या बाहेर पुरवठा साखळीसाठी पर्याय शोधत आहेत.

सॅमसंग आणि अ‍ॅपल सारख्या दिग्गज कंपन्यांचे अनेक अ‍ॅसेंबली पार्टनर भारतात येण्यास इच्छूक आहेत. या कंपन्या भारतात मोबाईल फोनची फॅक्ट्री लावण्यासाठी 1.5 अब्ज डॉलर (जवळपास 11,222 कोटी रुपये) गुंतवणूक आहे.

याआधी चीनमध्ये आपला व्यवसाय बंद करणाऱ्याच्या तयारीत असणाऱ्या कंपन्या व्हिएतनाम, कंबोडिया, म्यानमार, बांगलादेश आणि थायलंडमध्ये जाऊ इच्छित होत्या. मात्र भारताने तत्परता दाखवत कंपन्यांना आपल्याकडे येण्यास तयार केले आहे. भारताचा अंदाज आहे की प्रोडक्ट लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीममुळे (पीएलआय) देशात 153 अब्ज डॉलर्स इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन होऊ शकते व यामुळे 10 लाख लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळेल.