गणेशोत्सवासंदर्भात मुंबई, पुण्यासाठी प्रशासनाने जाहीर केली नियमावली

यंदा कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या काळात संसर्गाचा धोका वाढू नये यासाठी प्रशासन खबरदारी घेत आहे. दरवर्षी अगदी उत्साहात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाला मात्र यंदा कोरोनाने अडथळे आणले आहेत.

मुंबई आणि पुण्यातील गणेश भक्तांसाठी प्रशासनाने नियमावली जाहीर केली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी या नियमावलीचे पालन करणे गरजेचे आहे.

पुण्यासाठी नियमावली –

  • गणेशोत्वस मंडळांनी गणपतीची मुर्ती ऑनलाईन खरेदी करावी. रस्त्याच्या कडेल स्टॉलला परवानगी नसेल.
  • गणपतीच्या आगमन आणि विसर्जनावेळी मिरवणुका काढता येणार नाहीत.
  • ज्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मंदिरे आहेत, त्यांनी प्रतिष्ठापना मंदिरात करावी. मंदिर नसल्यास छोटा मंडप उभारण्याची परवानगी आहे.
  • सार्वजनिक मंडळांची गणेश मूर्ती चार फूट आणि घरगुती गणेश मूर्तीची उंची दोन फूट मर्यादित असावी.

मुंबईसाठी नियमावली –

  • यंदा नागरिकांना समुद्र किंवा तलावावर थेट गणपतीचे विसर्जन करता येणार नाही.
  • नैसर्गिक किंवा कृत्रीम विसर्जन स्थळे आहेत तेथे १ ते २ किमीच्या परिघातील नागरिकांनीच गणेश विसर्जनासाठी जाता येणार आहे.
  • नागरिकांना जवळील विसर्जन स्थळ नसल्यास महापालिकेच्या मूर्तीसंकलन केंद्रात गणेशमूर्ती द्यावी.
  • विसर्जनापूर्वीची पूजा, आरती आणि इतर विधी घरीच पूर्ण करण्याचं आवाहन महापालिकेने केलं आहे.
  • मुंबईत नैसर्गिक विसर्जन 70 आणि कृत्रिम विसर्जन स्थळे167 असतील.