ETrance Plus दमदार इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच

हैद्राबाद येथील PUR Energy प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच केली आहे. कंपनीने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Pure EV ETrance Plus (इट्रांस प्लस) ला 56,999 रुपये या किंमतीत लाँच केले आहे. इट्रांस प्लसमध्ये 1.25 KWH पोर्टेबल बॅटरी देण्यात आलेली आहे. कंपनीचा दावा आहे की सिंगल चार्जमध्ये स्कूटर 65 किमी अंतर पार करते.

इट्रांस प्लस ही एक लो-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर आहे. कंपनीनुसार, या स्कूटरचा टॉप स्पीड ताशी 25 किमी आहे. स्कूटर फूल चार्ज होण्यासाठी 4 तास लागतात. कंपनीने या स्कूटरला 4 रंगात बाजारात आणले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की या स्कूटरला रॉबस्ट चेसिसवर बनविण्यात आले आहे. भारतीय रस्त्यांच्या अनुरूप स्कूटरची बॉडी डिझाईन करण्यात आली आहे.

कंपनीच्या इतर मॉडेल्सबद्दल सांगायचे तर कंपनी Epluto, Etrance, Egnite आणि Etron+ यांची भारतीय बाजारात विक्री करते. इट्रांसच्या तुलनेत इट्रांस प्लस हायटेक आहे.  Pure EV ETrance एकदा चार्ज केल्यावर 60 किमी अंतर पार करते.