कोरोना संकटात दातांची तपासणी करावी की नाही ? डब्ल्यूएचओने जारी केली गाईडलाईन

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. घराच्या बाहेर पडताना मास्क लावणे अनिवार्य आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कोरोना व्हायरसपासून बचावासाठी नवीन गाईडलाईन जारी केली आहे. डब्ल्यूएचओने कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन दातांची तपासणी न करण्यास सांगितले आहे. संघटनेने डेंटल क्लिनिक आणि ओरल हेल्थ तज्ञांना शक्य असल्यास रुग्णांना व्हिडीओ कॉन्फ्रेंसद्वारेच सल्ला द्यावा असे म्हटले आहे.

नियमित चेकअप टाळावे –

डब्ल्यूएचओनुसार, लोकांनी सध्या नियमित चेकअप टाळावे. जोपर्यंत कोरोनाची रुग्ण संख्या कमी होत नाही, यावर नियंत्रण मिळविण्यात यश येत नाही, तोपर्यंत दातांची तपासणी टाळावी.

व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे सल्ला –

कोरोनाच्या संकटात दातांची काळजी स्वतः घ्यावी. खूपच अधिक आवश्यक असल्यास, फोन अथवा व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. असे केल्याने संसर्गाचा धोका कमी होईल. आरोग्य विशेषज्ञांना देखील धोका आहे. हॉस्पिटल, डेंटल क्लिनिक, पब्लिक ट्रांसपोर्ट अशा ठिकाणी संसर्गाचा धोका अधिक असतो. त्यामुळे गरज नसल्यास दातांची तपासणी काही दिवस टाळावी.

दातांच्या तपासणीमध्ये धोका –

डेंटल क्लिनिकमध्ये तीन प्रकारे संसर्ग पसरतो. खोकल्याने, शिंकल्याने तोंड व नाकातून ड्रॉपलेट्स बाहेर पडतात. लाळीद्वारे देखील संसर्ग होऊ शकतो. दातांची सफाई करताना किंवा अन्य उपचार करताना जी पद्धत डॉक्टर वापरतात, अशामुळे संसर्ग पसरू शकतो. कारण दातांचा उपचार करताना तोंडाला मास्क देखील लावणे शक्य नसते. त्यामुळे शक्य असल्यास घरीच डॉक्टरांचा फोनवरून सल्ला घेऊन उपचार करावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही