चीनच्या पहिल्या कोरोना लसीला मिळाले पेटंट

चीनने आपल्या देशातील पहिल्या कोरोना व्हायरस लसीच्या पेटंटला मंजूरी दिली आहे. कॅनसिनो बायोलॉजिक्स इंक ही कोरोना व्हायरस लसीचे पेटंट मिळवणारी पहिली चीनी कंपनी ठरली आहे. कॅनसिनो कंपनीने Ad5-nCOV नावाने लस तयार केली आहे.

चीनच्या नॅशनल इंटलेक्चुअल प्रॉपर्टी अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने 11 ऑगस्टलाच या कंपनीच्या पेंटटला मंजूरी दिली होती. याआधी सौदी अरेबियाने म्हटले होते की कॅनसिनो कंपनीच्या लसीचे तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरु करणार आहे. कंपनीने देखील रशिया, ब्राझील, चिलीमध्ये देखील तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू करणार असल्याचे म्हटले होते.

पेटंट मिळाल्याची माहिती मिळाल्यानंतर हाँगकाँगमध्ये कंपनीच्या शेअर्सचे भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढले. कॅनसिनोने या लसीला कँडिडेट कॉमन कोल्ड व्हायरसमध्ये बदल करत तयार केले आहे. याच प्रकारे ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटी देखील लस तयार करत आहे.