नेतृत्व बदलासाठी 100 नेत्यांचे सोनिया गांधींना पत्र

2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर काही महिन्यांनी पुन्हा एकदा सोनिया गांधी यांना पक्षाच्या अध्यक्षा बनविण्यात आले होते. आता काँग्रेसचे निलंबित नेते संजय झा यांनी ट्विट करत दावा केला आहे की, खासदारांसह जवळपास 100 काँग्रेस नेत्यांनी नेतृत्व बदलासाठी सोनिया गांधी पत्र लिहिले आहे.

माजी काँग्रेस नेते असलेल्या संजय झा यांनी ट्विट केले की, अंदाजानुसार जवळपास 100 काँग्रेस नेते (खासदारांसह) पक्षातील अंतर्गत कामकाजावर नाराज आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र देखील लिहिले असून, नेतृत्व बदल आणि सीडब्ल्यूसीमध्ये पारदर्शी निवडणुकीची मागणी केली आहे.

संजय झा यांनी या पत्राबाबत दावा केला असला तरीही अद्याप इतर कोणत्याही काँग्रेस नेत्याने याबाबत पुष्टी केलेली नाही.