पत्नी साक्षीची महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर भावनिक पोस्ट


मुंबई : काल स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत भारतीय संघाचा माजी कर्णधार तथा कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनीने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला अखेर पूर्णविराम दिला असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने घोषणा केली. पत्नी साक्षीनेदेखील महेंद्रसिंग धोनीच्या या घोषणेनंतर त्याच्या निवृत्तीवर भावनिक पोस्ट केली आहे.

याबाबत साक्षीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर लिहले आहे की, जे काही तू मिळवले आहे त्याचा तुला गर्व असला पाहिजे. आपले सर्वोत्तम योगदान क्रिकेटला दिल्याबद्दल तुझे अभिनंदन. मला तुझ्या कर्तृत्वाचा आणि तुझ्यातील व्यक्तीचा अभिमान आहे. मला माहित आहे की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करताना तू तुझ्या डोळ्यातील अश्रूंना थांबवले असशील. भविष्यातील तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. त्यासोबतच #thankyoumsd #proud हे दोन हॅशटॅग केले आहेत.

Loading RSS Feed