झारखंडच्या मुख्यमंत्र्यांची बीसीसीआयकडे अनोखी मागणी


रांची : काल एकीकडे संपूर्ण देश स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरे करत असतानाचा भारतीय संघाचा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत सर्वांनाच आश्चर्याचा घक्का दिला. त्याच्या निवृत्तीच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या होत्या. अखेर महेंद्र सिंग धोनी याने 15 ऑगस्टच्या दिवशीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. क्रिकेटविश्वात धोनीची सर्वाधिक यशस्वी कर्णधार अशी ओळख होती. धोनीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा देणाऱ्या तर काही आश्चर्य व हळहळ व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला.

त्यातच धोनीचे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी देखील कौतुक करत बीसीसीआयकडे एक मागणी देखील केली आहे. आतापर्यंतच्या धोनीचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी खेळासाठी कौतुक केले आहे. त्यांनी याबाबत एक ट्विट केले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, संपूर्ण देश आणि झारखंडचा धोनी हा गौरव आहे. माझ्या मते धोनीला एक अखेरचा सामना खेळायला मिळायला हवा. बीसीसीआयला मी विनंती करतो की धोनीसाठी एक अखेरचा सामना आयोजित केला जावा, अशी मागणी सोरेन यांनी केली आहे. या सामन्याचे साक्षीदार संपूर्ण जग असेल. बीसीसीआयने यासाठी पुढाकार घ्यावा. या सामन्याचे आयोजन संपूर्ण झारखंड करेल, असे मुख्यमंत्री सोरेन यांनी म्हटले आहे.