संशोधकांनी दिला धोक्याचा इशारा; हवामानातील बदलामुळे होणार जुन्या रोगांची वापसी


पॅरिस : संपूर्ण जग सध्याच्या घडीला कोरोना संकटाला तोंड देतच आहेत, त्यातच संशोधकांनी आणखी एका संकटाची शक्यता वर्तवली आहे. हवामानात होत असलेल्या बदलाला सामोरे जात आहे. पण यामुळे डेंग्यु, झिकासारखे जुने-सुप्त व्हायरस पुन्हा डोके वर काढू शकतात आणि याचा सर्वाधिक धोका युरोपला असल्याचा इशारा संशोधकांनी दिला आहे.

एखाद्या चित्रपटाच्या कथानकासारखे हे संकट वाटू शकते. पण हे व्हायरस, साथीचे रोग ग्लोबल वॉर्मिंगमुळे गंभीर बनत चालले आहेत. जगावर कोरोनामुळे मोठे संकट ओढावले असल्यामुळे या रोगामुळे लाखोंच्या संख्येत लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. त्याचबरोर जंगलावर झालेल्या मानवी अतिक्रमणामुळे हे सर्व काही घडत असल्याचा इशारा संशोधकांनी दिला आहे. परिणामी कोरोनासारखीच अन्य मोठी संकटे ओढवणार आहेत.

1 डिग्री सेल्सिअसची जगाच्या तापमानात वाढ झाली असल्यामुळे मलेरियासह डेग्यू सारख्या रोगांची ही तापमान वाढ वाहक बनली आहे. त्यामुळे देवी, शीतज्वरासारखे उत्पात माजविलेले व्हायरस पुन्हा परतण्याचा धोका असल्याचे म्हटले आहे.

याबाबत माहिती देताना स्वीडनच्या उमीया विद्यापीठाच्या मायक्रोबायोलॉजीच्या संशोधक बिर्गिट्टा इव्हनगार्ड यांनी सांगितले की, मानवाने त्यांची हद्द पार केल्यामुळे आपला आगामी काळ फारच कठीण दिसू लागला आहे. आपणच आपले शत्रू बनत चाललो आहोत. आपला मोठा शत्रू हा दुर्लक्ष करणे हा आहे.

रशिया, कॅनडा आणि अलास्काच्या भागात हवामान बदलाचा हा टाईम बॉम्ब पसरू लागला आहे. कारण या भागात जगात जेव्हा इंडस्ट्रीचा उगम झाला, तेव्हापासून तिप्पट कार्बन उत्सर्जन झाले आहे. जर मनुष्यवस्तीने 2015 च्या पॅरिस करारानुसार तापमान दोन डिग्री सेल्सिअसने कमी केले तर हा ध्रुव प्रदेशातील उघडी पडलेली जमीन 2100 पर्यंत पुन्हा बर्फाच्छादीत होईल असे युएनच्या हवामान पॅनेलने म्हटले आहे.