सुब्रमण्यम स्वामींचा धोनीला लोकसभा निवडणूक लढवण्याचा सल्ला


नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहिर केले आहे. निवृत्तीची घोषणा धोनीने ही आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून केली आहे. धोनीच्या या निर्णयानंतर भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी धोनीला लोकसभा निवडणूक लढण्याचा सल्ला दिला आहे. पण अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाला धोनीने पाठिंबा दर्शविला नाही.

रविवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवर महेंद्रसिंह धोनीला सल्ला देणारे ट्विट भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये, एमएस धोनी क्रिकेटमधून निवृत्त होत असून पण दुसर्‍या कोणात्याही गोष्टींपासून नाही. आव्हानांसोबत लढा देण्याची त्याची प्रतिभा आणि त्याने क्रिकेटमध्ये दाखविलेल्या संघाचे नेतृत्व करण्याची क्षमता सार्वजनिक जीवनात आवश्यक असून आगामी लोकसभा निवडणूक त्याने लढवावी, असे म्हटले आहे.