संशोधकांनी लावला शरीरातील कोरोना विषाणूची वाढ रोखणाऱ्या औषधचा शोध


वॉशिंग्टन – संसर्गानंतर शरीरातील कोरोना विषाणूच्या संख्येत होणारी वाढ रोखू शकेल, अशा औषधाचा शोध अमेरिकन संशोधकांनी लावला आहे. हे औषध आधीपासूनच अस्तित्वात असून पण आता त्याचा उपयोग कोरोनावर उपचार करण्यासाठी केला जाईल. या औषधाचे अॅब्सेलेन असे नाव असून याचा उपयोग बायपोलर डिसऑर्डर आणि ऐकण्याची क्षमता घटण्याच्या उपचारात केला जातो.

या औषधावर नवीन संशोधन अमेरिकेच्या शिकागो विद्यापीठाने केले आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, या औषधामुळे शरीरात कोरोना विषाणूंची संख्या वाढवणाऱ्या एंजाइमांवर नियंत्रण ठेवता येते. सायन्स अ‍ॅडव्हान्सस या जर्नलमधील प्रसिद्ध संशोधन अहवालानुसार, कोरोना व्हायरसला रिप्लीकेट (व्हायरसची संख्या वाढणे) होण्यापासून रोखण्यात एम-प्रो नावाचे एंजाइम अत्यंत उपयुक्त आहे. हाच आरएमए कोरोनाचा स्पाइक प्रोटीन बनवते. कोरोना एम-प्रो एंजाइमच्या मदतीने शरीरात संख्या वाढवते. त्यामुळे रुग्णाची प्रकृती गंभीर होते. आता संशोधक याच एंजाइमला नियंत्रिक करून उपचार करणार आहेत.

संशोधक जुआन डी-पॅब्लोनुसार, ज्या औषधाचा शोध टीमने घेतला ते कोरोनाच्या एंजाइम एम-प्रो विरोधात एखाद्या शस्त्रासारखे काम करेल. अॅब्सेलेन नावाच्या औषधाचा याला नियंत्रित करण्यासाठी उपयोग होईल. अँटीव्हायरल, एंटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडेटिव्ह सारखी वैशिष्ट्ये या औषधात आहेत. याद्वारे पेशी नष्ट होण्यापासून थांबवता येईल. याचा उपयोग आधीपासूनच बायपोलर आणि हिअरिंग लॉस सारख्या आजारांमध्ये केला जात आहे. या रोगांच्या उपचारांमध्ये हे औषध खूप प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.

संशोधकांनुसार, अॅब्सेलेन मानवासाठी सुरक्षित असल्याचे क्लिनिकल चाचण्यांमध्ये सिद्ध झाले आहे. आता आता हे कोरोनाच्या उपचारात वापरले जाऊ शकते. संशोधकांनुसार, सध्या कोरोनाचे ते प्रोटीन्स शोधत आहेत, जे संक्रमित व्यक्तीची प्रकृती नाजुक बनवतात. याद्वारे, विषाणूंच्या नवीन धोक्याचा शोध घेऊन त्यावरील उपचार शोधले जातील.