भारतीय संघाचे माजी कसोटीपटू चेतन चौहान यांचे निधन


नवी दिल्ली – भारताचे माजी कसोटीपटू चेतन चौहान यांचे वयाच्या 73 वर्षी रविवारी निधन झाले. चेतन चौहान यांनाही मागील महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. पण, शुक्रवारी त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांचा भाऊ पुष्पेंद्र चौहाऩ यांनी रविवारी त्यांचे निधन झाल्याची माहिती दिली. त्यांना जुलै महिन्यात कोरोना झाला होता.

1969 ते 1978 या कालावधीत चौहान यांनी 40 कसोटी सामने खेळले होते. 31.57च्या सरासरीने त्यांनी 2084 धावा केल्या असून त्यांच्या नावावर 16 अर्धशतके आहेत. तर 13 वर्ष त्यांनी DDCAचे उपाध्यक्षपदही सांभाळल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. कसोटीव्यतिरिक्त त्यांनी 7 एकदिवसीय सामन्यांत 153 धावा ही केल्या. त्यांनी रणजी चषक स्पर्धेत दिल्ली व महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले होते.