निवृत्ती मागे घेणार युवराज ? पीसीएने केले आवाहन

भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंहने जून 2019 मध्ये क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारातून निवृत्ती घेतली होती. 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये युवराजची निवड झाली नव्हती. या वर्ल्ड कपनंतर त्याने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तो परदेशातील लीगमध्ये खेळत आहे.

आता पंजाब क्रिकेट असोसिएशनचे सचिव पुनित बाली यांनी युवराजला निवृत्तीच्या निर्णयाबाबत पुनर्विचार करावे असे म्हटले आहे. युवराजला याबाबत विचार करण्यास सांगितले असून, अद्याप त्याच्याकडून याबाबत उत्तर आले नसल्याचे बाली यांनी सांगितले.

पंजाबने अनेक महत्त्वाचे खेळाडू गमावले आहेत. अशात युवराजच्या अनुभवाच्या मदतीने पंजाब या स्थितीमधून बाहेर पडू शकतो. युवराज टीमला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकेल, असे बाली म्हणाले. मात्र युवराजला परतण्यासाठी बीसीसीआयकडून याबाबत परवानगी घ्यावी लागेल.

बाली म्हणाले की, शुभमन गिल, अनमोलप्रीत सिंह, अभिषेक सिंह या खेळाडूंना युवराजने ट्रेनिंगच्या वेळेस जवळून पाहिले. युवराज चंदीगढमध्ये असताना त्यांच्यासोबत ट्रेनिंगमध्ये भाग देखील घेतला. आमचे अनेक खेळाडू चंदीगड, छत्तीसगड आणि हिमाचलमध्ये गेले आहेत. त्यामुळे आम्हाला वाटते की युवराजची अनुभव आणि क्षमता युवा खेळाडूंना प्रेरित करण्यासाठी मोठी भूमिका पार पाडेल. दरम्यान, युवराजने भारताकडून  40 कसोटी, 304 एकदिवसीय आणि 58 टी-20 सामने खेळले आहेत.