… म्हणून महाराष्ट्रातील या गावामधील मुले शिकत आहेत जपानी भाषा

महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यामधील एका गावातील विद्यार्थी जपानी भाषा शिकत आहेत. जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेती विद्यार्थी रोबोटिक्स आणि तंत्रज्ञानासंबंधी ज्ञान मिळविण्यासाठी ही भाषा शिकत आहे. औरंगाबादपासून 25 किमी अंतरावर असलेल्या गडिवत भलेही मुलभूत सेवा पोहचल्या नसतील, मात्र इंटरनेट सेवा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे.

सरकारी शाळेने मागील वर्षी सप्टेंबरमध्ये एका परदेशी भाषेचा कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या अंतर्गत चौथी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आपल्या आवडीची एक भाषा निवडण्यास सांगण्यात आले होते. शाळेतील शिक्षक दादासाहेब नपूत यांनी सांगितले की, बहुतांश विद्यार्थ्यांनी सांगितले की, त्यांना रोबोटिक्स आणि तंत्रज्ञानामध्ये रस असून, त्यांना जपानी भाषा शिकायची आहे.

जपानी भाषा शिकण्यासाठी उचित अभ्यासक्रम सामग्री, मार्गदर्शन नसले तरीही शाळा प्रशासन इंटरनेटवर व्हिडीओ, भाषांतरचा प्रयोग करून माहिती जमा करत आहे. आता औरंगाबादचे भाषा विशेषज्ञ सुनिल जोगदेव हे विद्यार्थ्यांना भाषा शिकवत आहेत. शाळेच्या या उपक्रमाबाबत जोगदेव यांना माहिती मिळताच, त्यांनी आवडीने विद्यार्थ्यांना शिकवण्यास तयारी दर्शवली.

जोगदेव यांनी सांगितले की, जुलैपासून आतापर्यंत 20 ते 22 सत्र आयोजित केले. मुलांना शिकण्याची इच्छा आहे. कमी वेळेतच त्यांनी खूप काही शिकले आहे. सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणासाठी स्मार्ट फोन नाहीत. त्यामुळे शाळेने विश्वमित्र उपक्रम सुरू केला. ज्या अंतर्गत ऑनलाईन वर्गात जे शिकवले, ते विद्यार्थी आपल्या मित्रांना शिकवू शकतात. शाळेत 350 पेक्षा अधिक विद्यार्थी असून, यातील 70 जपानी भाषा शिकत आहेत. औरंगाबाद जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकार रमेश ठाकूर म्हणाले की, या उपक्रमाचा उद्देश मुलांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण उपलब्ध करून देणे हा आहे.