चीनसोबतच्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने एक वर्षासाठी आयपीएलचा टायटल स्पॉन्सर असलेल्या व्हिवो कंपनीला वगळले आहे. त्यामुळे आता देशातील स्पॉन्सरचा शोध सुरू झाला आहे. आयपीएलला स्पॉन्सर करण्यासाठी आता बाबा रामदेव यांच्या पतंजलीनंतर टाटा समूह देखील सहभागी झाला आहे. टाटा समूहाने या वर्षी होणाऱ्या आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशिपसाठी इच्छा व्यक्त केली आहे. टाटा समूहाने याबाबत बीसीसीआयला एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट (ईओआय) पाठवले आहे.
पंतजलीनंतर आता आयपीएल स्पॉन्सरशिपच्या शर्यतीत टाटा समूह
टाटा आणि पंतजली व्यतिरिक्त स्पॉन्सरशिपच्या शर्यतीमध्ये एज्यूकेशन टेक्नोलॉजी कंपनी अनअॅकेडमी आणि फँट्सी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म ड्रीम-11 देखील आहे. बीसीसीआयला ईओआय पाठविण्याची अंतिम तारीख 14 ऑगस्ट होती. तर 18 तारखेला अंतिम बोली लावली जाणार आहे.
टाटा समूह या शर्यतीमध्ये सहभागी झाल्याने आता अंतिम बोलीमध्ये चुरस वाढली आहे. आतापर्यंत 5 जणांनी यासाठी ईओआय पाठवल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, यावर्षी आयपीएलचे 19 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर दरम्यान यूएईमध्ये आयोजन केले जाणार आहे.