धुम्रपानामुळे वाढतो कोरोना संसर्गाचा धोका, या देशाने घातली बंदी

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून, दररोज हजारो नवीन रुग्ण आढळत आहे. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान केल्याने देखील व्हायरसचा संसर्ग वाढत असल्याचे समोर आले आहे. यामुळे स्पेनमध्ये सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यावर बंदी घातली आहे. स्पेनच्या आरोग्य मंत्रालयानुसार धुम्रपानामुळे कोरोनाचा संसर्ग वाढतो. जुलैमध्ये प्रकाशित एका अभ्यासात दावा करण्यात आला होता की, धुम्रपान केल्यामुळे लोकांच्या श्वासातून अधिक प्रमाणात ड्रॉपलेट्स बाहेर पडतात.

स्पेनच्या काही भागांमधील रस्ते, सार्वजनिक ठिकाणी, रेस्टोरंट-बारमध्ये स्मोकिंगवर बंदी घालण्यात आली आहे. स्पेनमधील आणखी काही भागत ही बंदी घातली जाणार आहे.

जुलैमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, धुम्रपान करणाऱ्या लोकांच्या तोडांतून मोठ्या प्रमाणात ड्रॉपलेट बाहेर पडतात. कोणासोबत धुम्रपान केल्याने हात आणि तोंडाचा संपर्क आल्याने देखील संसर्गाचा धोका वाढतो. धुम्रपान करताना लोकांना मास्क देखील काढावा लागतो.

अभ्यासात म्हटले होते की, तंबाखूच्या सेवनामुळे श्वासासंबंधी आजारांवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे धुम्रपानामुळे कोरोनाचा संसर्ग झाल्यास गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो.