पंतप्रधान मोदींनी लाँच केले राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशन, जाणून घ्या याबाबत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 74व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. या निमित्ताने मोदींनी राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशनची (एनडीएचएम) घोषणा केली. एनडीएचएम भारतातील आरोग्य क्षेत्रात क्रांती आणेल, असे मोदींनी म्हटले आहे. मोदी म्हणाले की, आजपासून देशात एक मोठ्या अभियानाची सुरुवात होत आहे. हे अभियान राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशन आहे. आता प्रत्येक चाचणी, प्रत्येक आजार, तुम्हाला कोणत्या डॉक्टरांने कोणते औषध दिले, केव्हा दिले, तुमचा रिपोर्ट काय होता ही सर्व माहिती एका हेल्थ आयडीमध्ये समाविष्ट असेल.

कसे काम करेल एनडीएचएम ?

या मिशन अंतर्गत डॉक्टरांच्या माहितीसह देशभरातील आरोग्य सेवांची माहिती अ‍ॅपवर उपलब्ध असेल. हे अ‍ॅप डाउनलोड करून तुम्हाला आपले रजिस्ट्रेशन करावे लागेल. यानंतर तुम्हाला एक हेल्थ आयडी मिळेल. या तुमचे उपचार, रिपोर्ट सर्व माहिती सेव्ह करावी लागेल, जेणेकरून याचा एक रिकॉर्ड तयार होईल.

जेव्हा तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जाल, त्यावेळी सर्व कागदपत्रे, रिपोर्ट घेऊन जाण्याची गरज पडणार नाही. डॉक्टर कोठेही बसून यूनिक आयडीद्वारे मेडिकल रिकॉर्ड पाहू शकतील. यावर रजिस्ट्रेशन करणे स्वैच्छिक असेल.

पंतप्रधान मोदी यावेळी माहिती दिली की, भारतात कोरोनाच्या एक-दोन नव्हे, तर तीन-तीन लसींवर सध्या काम सुरू आहे. वैज्ञानिकांनी हिरवा कंदील दाखवल्यावर या लसींचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाईल. लोकांपर्यंत लस पोहचवण्याचा आराखडा देखील तयार आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही