भारतातील कोरोना लसींची प्रगती कुठपर्यंत ?, मोदींनी दिली माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 74व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने देशाला संबोधित केले.  कोरोना व्हायरसमुळे मर्यादित संख्येत लोकांना बोलवण्यात आले आहे. यावेळी मोदींनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतानाच कोरोना व्हायरस महामारीच्या लढ्या सर्वात पुढे असलेल्या कोरोना योद्धांचे देखील अभिवादन केले.

मोदींनी देशाला संबोधित करताना देशातील कोरोना व्हायरसची लसची किती प्रगती झाली आहे. याचीही माहिती दिली. मोदींनी सांगितले की, भारतात कोरोनाच्या एक-दोन नव्हे, तर तीन-तीन लसींवर सध्या काम सुरू आहे. वैज्ञानिकांनी हिरवा कंदील दाखवल्यावर या लसींचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाईल. लोकांपर्यंत लस पोहचवण्याचा आराखडा देखील तयार आहे.

लाल किल्यांवरून बोलताना मोदी म्हणाले की, स्वातंत्र्यासाठी विस्तारवादाचा विचार असणाऱ्यांनी विस्तार करण्यासाठी खूप प्रयत्न केले. पुढील वर्ष आपण 75व्या वर्षात प्रवेश करणार आहोत. एक मोठा कालावधी आपल्या समोर आहे. गुलामीच्या काळात एक क्षणही असा नव्हता, जेव्हा स्वातंत्र्यासाठी देशातील प्रत्येक कोपऱ्यात लोकांनी बलिदान दिले नसेल. मोदी म्हणाले की, आपल्याला आत्मनिर्भर बनावे लागेल व दुसऱ्यांवरील निर्भरता कमी करावी लागेल. जोपर्यंत आपण आयात करत राहू, तोपर्यंत आपले स्किल वाढणार नाही.

चीनसोबतच्या संघर्षावर बोलताना मोदी म्हणाले की, एलओसीपासून ते एलएसीपर्यंत देशाच्या सार्वभौमत्वाकडे डोळे दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना देशाच्या सैन्याने त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. भारताच्या सार्वभौमत्वाचा आदर आमच्यासाठी सर्वोच्च आहे. या संकल्पासाठी आपले शूर जवान काय करू शकतात, देश काय करू शकतो, लडाखमध्ये जगाने पाहिले आहे.