नकाशा वादानंतर नेपाळच्या पंतप्रधानांनी पहिल्यांदाच साधला मोदींशी संवाद

नेपाळसोबत मागील अनेक दिवसांपासून सीमावादामुळे तणाव निर्माण झाला आहे. नकाशा वादानंतर आज पहिल्यांदाच नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींशी संवाद साधला. दोन्ही देशातील नेत्यांमध्ये जवळपास 10 मिनिटे चर्चा झाल्याचे सांगितले जाते.

केपी शर्मा ओली यांनी फोन करून शुभेच्चा देण्यासोबतच मोदींबरोबर अन्य विषयांवर देखील चर्चा केली. ओली यांचे म्हणणे आहे की, या चर्चेचा वापर कोणाचाही विजय-पराभव किंवा कोणाला कमी दाखवण्यासाठी करू नये. दोन्ही देशांमधील संबंध सुधारत आहेत. दोन्ही बाजूंनी प्रयत्न होत आहेत.

त्याआधी केपी शर्मा ओली यांनी ट्विट करत देखील पंतप्रधान मोदी आणि देशातील नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. भारतीय नागरिकांच्या प्रगती आणि समृद्धीसाठी शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छांसाठी पंतप्रधान मोदींनी देखील त्यांचे आभार मानले.

दरम्यान, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने चीनचे राजदूत सन वेईडोंग यांच्यासह याशिवाय अनेक देशांनी आज भारताला शुभेच्छा दिल्या.