‘वंदे मातरम् न म्हणणे घाणेरडे आणि लाजिरवाणे’, केजरीवालांचा ‘तो’ व्हिडीओ भाजप नेत्यांने केला शेअर

भाजप नेते कपिल मिश्रा यांनी स्वातंत्र्य दिन समारोहाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.

कपिल मिश्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून वंदे मातरम् चे नारे देत आहेत. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर समोर बसलेले कॅबिनेट मंत्री आणि अन्य पाहुणे देखील वंदे मातरम् चे नारे लावतात. मात्र पाहुण्यांमध्ये बसलेले अरविंद केजरीवाल या व्हिडीओमध्ये गप्प बसलेले दिसत आहेत. यावरूनच मिश्रा यांनी केजरीवालांवर निशाणा साधला.

मिश्रा यांनी हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, वंदे मातरम् न म्हणणे हे घाणेरडे आणि लाजिरवाणे आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.