चंद्रावर बिल्डिंग बांधण्यासाठी भारतीय वैज्ञानिकांनी मानवी मूत्रापासून बनवली विट

विज्ञानाने आता एवढी प्रगती केली आहे, मानव आता चंद्रावर घर बांधण्याची योजना बनवू लागला आहे. चंद्रावर बिल्डिंग बांधण्याचे तंत्र देखील भारतीय वैज्ञानिकांनी शोधले आहे. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) आणि भारतीय अंतराळ संसोधन संस्था (इस्त्रो) यांनी स्पेस ब्रिकची निर्मिती केली आहे. या विटांना खासकरून चंद्रावर बिल्डिंग बांधण्यासाठी तयार करण्यात आले आहे. आयआयएससीने सांगितले की, या विटांच्या निर्मितीसाठी लूनर सॉइल, बॅक्टेरियासोबत गवारीच्या बियांचा वापर करण्यात आला आहे.

वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, पृथ्वीवरून 1 पाउंड मटेरियल अंतराळात पाठविण्यासाठी 7.5 लाख रुपये खर्च येईल. वैज्ञानिक या गोष्टीचा शोध घेत आहेत की, चंद्रावरील निर्मितीसाठी कच्चा माल चंद्राच्या मातीचाच उपयोग करण्यात यावा. आयआयएससी आणि इस्त्रोच्या टीमने यूरियाचा उपयोग करत विट तयार केली आहे. ज्यात मानवी मूत्र आणि लूनर सॉइलचा वापर करण्यात आला आहे. या तंत्राचा खर्च देखील कमी असेल.

भारतीय वैज्ञानिकांनी विटांच्या निर्मितीसाठी बॅक्टेरियाला लूनर सॉइलमध्ये मिसळले. यानंतर यूरिया आणि कॅल्शियमसह गवारीच्या बियांमधून निघालेला गम टाकण्यात आला. या प्रक्रियेनंतर काही दिवसांनी जी विट बनली, ती खूपच मजबूत आणि ठोस होती. या विटांना कोणताही आकार देणे शक्य आहे.

विटांना बनविण्यासाठी लागणाऱ्या मातासाठी वैज्ञानिकांनी बंगळुरूमध्ये अनेक चाचण्या केल्या. यानंतर यात बॅसिलस वेलेझेनसिसचा प्रयोग करण्यात आला.