कोव्हिड योद्ध्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण

74व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयातील ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम पार पडला. मुंबईतील वर्षा बंगल्यावर देखील ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. मंत्रालयातील ध्वजारोहणावेळी कोरोना योद्धांना विशेष आमंत्रण देण्यात आले होते. यावेळी उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे, इतर मान्यवर आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय आणि पोलिस यंत्रणेत काम करणारे कर्मचारी, स्वच्छता दूत हे खरे कोविड योद्धे आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोव्हिड योद्धांना भेटून त्यांच्या कामाचे कौतुक केले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी जय जवान, जय किसानचा नारा देत, शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करणार असून, वोगावी आणि दुर्गम भागापर्यंत चांगल्या आरोग्य सुविधा देणार असल्याचे सांगितले. तसेच ऑनलाइन शिक्षण सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचेही ते म्हणाले.