‘शांती आणि मैत्रीसह पुढे जाऊ’, चीनने स्वातंत्र्य दिनाच्या भारताला दिल्या शुभेच्छा

74व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने चीनने आज भारताला शुभेच्छा दिल्या आहेत. मागील अनेक दिवसांपासून भारत-चीनमध्ये सीमावादावरून तणाव निर्माण झाला असताना, चीनने शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतातील चीनचे राजदूत सन वेईडोंग म्हणाले की, स्वातंत्र्य दिनाच्या भारत सरकार आणि नागरिकांना शुभेच्छा. आम्हा आशा आहे की दोन्ही महान देश शांती आणि प्रगतीच्या दिशेने मिळून पुढील वाचचाल करतील. मे महिन्यापासून जारी असलेल्या तणावावर अनेकदा चर्चा होऊनही अजून तोडगा निघालेला नाही. अशातच आता वेईडोंग यांनी भारताला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

चीन व्यतिरिक्त अन्य देशांनी देखील भारताला शुभेच्छा दिल्या. नेपाळ, भूटान आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी भारताला शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी लाल किल्यावरुन देशाला संबोधित करताना चीन आणि पाकिस्तानवर निशाणा साधला. एलओसीपासून ते एलओसीपर्यंत ज्याने डोळे वटारून पाहिले, त्यांना सडेतोड उत्तर देण्यात आले. आपले जवान काय करू शकतात, हे संपुर्ण जगाने लडाखमध्ये पाहिले.