लस कोरोनापासून 2 वर्ष सुरक्षा करणार, रशियाचा दावा

कोरोना व्हायरसवर प्रतिबंधक लस शोधण्याचे काम जगभरात सुरू आहे. रशियाने या व्हायरसवरील लस शोधल्याचा दावा करत बाजी मारली आहे. लवकरच या लसीचे उत्पादन आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू होणार असल्याची देखील माहिती देण्यात आलेली आहे. आता लस बनवणाऱ्या रशियन कंपनीने ही लस कमीत कमी 2 वर्ष व्हायरसपासून मनुष्याचे रक्षण करेल, असे म्हटले आहे.

रशिया आरोग्य मंत्रालयाच्या गमलेया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर एपिडेमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीचे संचालक अ‍ॅलेक्झँडर गिंट्सबर्ग यांनी दावा केला आहे की, कोरोना व्हायरसच्या विरोधात रशियाच्या लसीचे सुरक्षात्मक गुण कमीत कमी 2 वर्ष कायम राहतील. एका टिव्ही कार्यक्रमात ते म्हणाले की, लसीच्या प्रभावाचा कालावधी, यासाठी सुरक्षात्मक गुण कमी कालावधीसाठी प्रभावी नाही. कमीत कमी 2 वर्ष ही लस प्रभावी राहील.

रशियाने 11 ऑगस्टला आपल्या लसीला अधिकृत मंजूरी दिली होती. मात्र रशियाच्या या लसीला अद्याप जागतिक आरोग्य संघटनेने स्विकारलेले नाही. तर दुसरीकडे 20 देशांनी या लसीच्या कोट्यावधी डोसची मागणी देखील केली आहे.