माकडांवर सुद्धा चाचणी करणार नाही, अमेरिकेने लसीवरुन उडवली रशियाची खिल्ली

जगभरात एकीकडे दिवस-रात्र कोरोना व्हायरस लसीच्या निर्मितीसाठी काम सुरू आहे. तर दुसरीकडे रशियाने सर्वात आधी लस तयार केल्याचा दावा केला आहे. स्वतः रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांनी याबाबत माहिती दिली. मात्र जागतिक आरोग्य संघटनेसह जगभरातील अनेक देशांनी या लसीला अद्याप गंभीरतेने घेतलेले नाही. या लसीचे अद्याप तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल बाकी असून, रशियाने अद्याप लसीबाबत सविस्तर माहिती देखील दिलेली नाही. अमेरिकेने देखील आता रशियाच्या लसीची खिल्ली उडवली आहे.

अमेरिकेने म्हटले आहे की, आम्ही रशियाच्या लसीचे ट्रायल मनुष्यच काय, माकडांवर देखील करणार नाही. अमेरिकेत रशियाच्या लसीला अपुर्ण मानले जात आहे. त्यामुळे याला कधीही गंभीरतेने घेण्यात आलेले नाही.

रशियन अधिकारी लसीबाबतची माहिती अमेरिकेसोबत शेअर करण्यास तयार आहेत. रशियाने अमेरिकन कंपन्यांना त्यांच्याच देशात रशियाच्या लसीचे उत्पादन करण्यासाठी परवानगी देण्यास तयार आहे. अमेरिकन कंपन्या यात रस दाखवत असल्याचा दावा देखील रशियाने केला. मात्र, अमेरिकेने या लसीची चाचणी मनुष्य तर सोडाच, माकडांवर देखील करणार नाही, असे म्हणत रशियाची खिल्ली उडवली आहे.