स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने गृह मंत्रालयाने केली वीरता पुरस्कारांची घोषणा

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पोलीस कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या वीरता पुरस्कार आणि सर्व्हिस अ‍ॅवॉर्डची यादी जाहीर करण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने माहिती दिली की, 215 कर्मचाऱ्यांना त्यांच्या वीरतेसाठी पोलीस पदक, 80 कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक, विशिष्ट सेवेसाठी 631 जणांना पोलीस पदक दिले जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 14 जणांना गॅलेंट्री, 5 जणांना राष्ट्रपती पदक आणि 39 जणांना पोलीस पदक देऊन सन्मानित केले जाणार आहे.

याशिवाय उत्तर प्रदेशमधील 102, जम्मू-काश्मिर 94, आंध्र प्रदेश 16, अरुणचाल प्रदेश4, आसाम 21, छत्तीसगढ 14, गोवा 1, गुजरात 19. हरियाणा 12, हिमाचल प्रदेश 4, झारखंड 24, कर्नाटक 19, केरल 6, मध्य प्रदेश 20, मणिपुर के 7, मिजोरम के 3, नगालैंड के 2, ओडिशा के 14, पंजाब के 15, राजस्थान 18, सिक्किम 2, तामिळनाडू 23, तेलंगाना 14, त्रिपूरा 6, उत्तराखंड 4 आणि पश्चिम बंगालमधील 21 कर्मचाऱ्यांचा वीरता पुरस्काराने सन्मान केला जणार आहे.

केंद्रशासित प्रदेशासह अर्धसैनिक दल आणि अन्य संस्थांच्या श्रेणीमधील आसाम रायफल्स, बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, एनएसजी, एसएसबी, आयबी, सीबीआय, एसपीजी, बीपीआर अँडी डी, एसबीआरबी, एनआयए, एसपीवी एनपीए, एनडीआरएफ, आरपीएफ आणि एमएचए प्रॉपरमधील कर्मचाऱ्यांना देखील पुरस्कार दिला जाणार आहे.