अमित शाहांची कोरोना चाचणी निगेटिव्ह, काही दिवस आयसोलेशनमध्ये राहणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना काही दिवसांपुर्वी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यानंतर त्यांच्यावर मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. आता त्यांनी ट्विट करत आपली कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. त्यांना 2 ऑगस्टला कोरोनाची लागण झाली होती.

अमित शाह यांनी ट्विट केले की, आज माझी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मी देवाचे आभार मानतो आणि या काळात ज्यांनी माझ्या चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा देऊन माझे आणि कुटुंबाचे धाडस वाढवले त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणखी काही दिवस होम आयसोलेशनमध्ये राहील.

त्यांनी आणखी एक ट्विट करत उपचारासाठी मेदांता हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले.