फोनमध्ये बँकेची माहिती असेल तर त्वरित करा डिलीट, ‘ब्लॅकरॉक’ करेल खाते रिकामे

जर तुम्ही देखील आपल्या फोनमध्ये बँक अकाउंटचा पासवर्ड, एटीएम पिन किंवा इंटरनेट बँकिंगची माहिती सेव्ह करत असाल, तर तुम्ही सावध होणे गरजेचे आहे. कारण, अँड्राईड फोनमध्ये एक नवीन व्हायरस आला आहे, जो तुमच्या बँकेशी संबंधित माहिती चोरी करतो. या व्हायरसचे नाव ब्लॅकरॉक आहे. ब्लॅकरॉक अँड्राईड मॅलवेअरबाबत भारत सरकारच्या सायबर एजेंसीने देखील लोकांना सुचित केले आहे. हा मॅलवेअर जवळपास 337 अँड्राईड अ‍ॅप्सची माहिती चोरी करू शकतो. हा व्हायरस जीमे, अ‍ॅमेझॉन, नेटप्लिक्स आणि उबर सारख्या अ‍ॅप्समधील माहिती चोरी करू शकतो.

या मॅलवेअरची सर्वात प्रथम माहिती थ्रेटफॅब्रिकने दिली. हे मॅलवेअर strain Xerxes सोर्स कोडवर आधारित आहे. मॅलवेअर कोणत्याही अ‍ॅपमध्ये लॉगइन करत असताना माहिती चोरी करतो.

Image Credited – Amarujala

मॅलवेअर ज्या टेक्निकने डेटा चोरी करतो, त्याला ओव्हरलेयस म्हणतात. या टेक्निक अंतर्गत मॅलवेअर असणारे अ‍ॅप्स एका बनावट वेब पेजवर युजरला लॉग इन करायला सांगतात. हे मॅलवेअर युजरकडून मेसेजिंग, कॅमेरा, गॅलेरी इत्यादीचा अ‍ॅक्सेस घेतो. याशिवाय युजरला खोट्या गुगल अपडेटेशनचे नॉटिफिकेशन पाठवतो.

Image Credited – Amarujala

हे मॅलवेअर अँटीव्हायरस अ‍ॅपला देखील चकमा देते. त्यामुळे कोणतेही थर्ट पार्टी अ‍ॅप आपल्या फोनमध्ये डाऊनलोड करणे टाळावे. थर्ट पार्टी ब्राउजरचा देखील उपयोग करू नये.